ईव्हीएम ची केली पूजा केल्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादात सापडल्या असून इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या आज ताट आणि दिवा घेऊन मतदान केंद्रावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी थेट इव्हीएम मशीनची पूजा केली. मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्याने याप्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.