छत्रपती संभाजीनगर ;- वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील सख्ख्या बहिणीचा प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने व आईने कोयत्याने सपासप वार करून निर्दयीपणे शिर धडावेगळे केले होते.यानंतर सख्ख्या भावाने बहिणीच्या मुंडके हातात घेऊन बाहेर येत सेल्फी काढली होती.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेल्याची खळबळजनक घटना घडली होती .आरोपी सख्खा भाऊ व आई यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज् शनिवार ता.18 जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे..
.या घटने बाबत अधिक माहिती अशी की,वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील किशोरी उर्फ किर्ती हिने अविनाश संजय थोरे यांच्याशी पळुन जाउन आंळदी येथे प्रेम विवाह केला होतो.यानंतर अविनाश व किर्ती या दोघांना वैजापूर पोलिस स्टेशनला आणल्यांनतर त्यावेळी किर्तीच्या वडीलांनी फिर्यादी अविनाश थोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
अविनाश याने पत्नी किर्तीमुळे या प्रकरणात तक्रार दिली नाही.मात्र 05 डिसेंबर 2021 ला दुपारी बारा वाजेच्या सुमारास कीर्ती किचनमध्ये असताना पती अविनाश याला आवाज आल्याने तो तेथे गेला असता
किचन मधे जावून पहिले असता पत्नी कीर्ती जमीनवर पडलेली होती.किर्तीची आई शोभा मोटे हीने किर्तीचे पाय पकडले होते व संकेत मोटे हा किर्तीच्या गळयावर कोयत्याने सपासप वार करीत होता त्यावेळी अविनाश सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी संकेतने अविनाशवर कोयता उगारला त्यामुळे तो घाबरुन किचनच्या बाहेर पळाला. त्यांनंतर त्याने चुलती व आजी यांना बोलवले. तेव्हा आजी गिताबाई थोरे व चुलती कविता थोरे या पळत आल्या त्यावेळी संकेत मोटे व शोभा मोटे यांनी किर्तीस जिवंत मारुन तिचे मुंडके धडावेगळे करुन ओटयावर घेवून आला व खिशातला मोबाईल काढुन संकेत मोटे याने मुडक्यासह सेल्फी घेतली व मुंडके ओटयावर टाकून दिले. त्यानंतर आरोपी शोभा मोटे यांने संकेतला सांगितले की कोयता घे तेव्हा संकेत मोटे यांने कोयता हातात घेतला व दोघे विना नंबरची बजाज सिटी 100 मोटरसायकलने घराकडे निघून गेले.
किशोरी उर्फ किर्तीने अविनाश थोरे याच्या बरोबर प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरुन किशोरी उर्फ किर्तीचे शोभा मोटे हीने पाय धरले व संकेत मोटे याने किर्तीच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करुन मुडके धडावेगळे केले होते .
सदर घटनेची कीर्तीचा पती अविनाश संजय थोरे यांनी विरगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून विरगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान सदर गुन्हयात दोषरोपपत्र वैजापूर न्यायालयात दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा जिल्हा व सत्र न्यायालय येथे वर्ग झाला. सत्र खटला मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम मोईद्यीन एम. ए. यांच्या न्यायालयात सुनावणी झाली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल बाळासाहेब महेर यांनी साक्षी पुरव्यादरम्यान 9 साक्षीदाराच्या साक्षी नोंदविल्या. त्यात साक्षीदार क 01 फिर्यादी अविनाश संजय थोरे व डॉ. वैशाली हजारी यांची साक्ष व रासायनिक विश्लेषण अहवाल महत्वाचा ठरल
साक्षी पुरव्याअंती सरकार पक्षाने आरोप सिध्द केल्यामुळे मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश . एम माहियोधीन एम. ए. यांनी आरोपी संकेत संजय मोटे, याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली व प्रत्येकी एक हजार रू. दंड केला दंड न भरल्यास एक महीने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व कलम 449 अन्वये पाच वर्षे शिक्षा व पाचशे रु दंड न भरल्यास १५ दिवसाची साधा कारावासाची शिक्षा तसेच कलम ४५२ नूसार ३ वर्षे शिक्षा व दंड ५०० रु न भरल्यास १५ दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा तसेच बाल गुन्हेगार कायदानूसार वयाच्या २१ वर्षे होई पर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश पारीत केले व वयाचे २१ वर्षे पुर्ण झाल्यांनतर जेलमध्ये हस्तांतरीत करण्याचे आदेश पारीत केले. आरोपी शोभा संजय मोटे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली व प्रत्येकी एक हजार रू. दंड केला दंड न भरल्यास एक महीने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व कलम 449 अन्वये पाच वर्षे शिक्षा व पाचशे रु दंड न भरल्यास १५ दिवसाची साधा कारावासाची शिक्षा तसेच कलम ४५२ नूसार ३ वर्षे शिक्षा व दंड ५०० रु न भरल्यास १५ दिवसाची साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीस कलम 120बी भादवी व 4/25 भा.ह.का. या कलमातून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात सरकार पक्षा तर्फे बाळासाहेब महेर यांनी काम पाहीले. व त्यांना पैरवी अधिकारी पो. का. सतिष गायकवाड व . विठ्ठल जाधव यांनी सहकार्य केले. सदर प्रकरणात व्ही. ए. नरवडे सहा. पोलिस निरीक्षक यांनी तपास केला होता.