जिल्ह्यातील दोन्ही जागा बहुमताने निवडून येतील देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळच्या सभेत विश्वास

0

 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आता फैसला करण्याची वेळ आली आहे. तुम्ही हा निर्णय करायचा आहे. अजमल कसाबची सोबत करणाऱ्यांची सोबत करायची आहे, की ज्यांना फासावर चढवतात त्या उज्वल निकम साहेबांची सोबत करायची आहे. ही दिल्लीची निवडणूक आहे. रक्षाताईंनी गेल्या दहा वर्षात या ठिकाणी सातत्याने गावोगावी संपर्क ठेवला देशाच्या राज्याच्या माध्यमातून अनेक कामे या ठिकाणी केली. मोदीजींचा विकास या जिल्ह्यापर्यंत आणण्यात रक्षा खडसे यांचा वाटा आहे. त्यामुळे रक्षाताई पुन्हा तुमच्यापुढे मत मागण्यासाठी आलया आहेत. त्यामुळे 13 मे रोजी रक्षाताईंना मतदान करून त्यांना भेट द्या. कारण १३ मे रोजी रक्षाताईंचा वाढदिवस आहे. त्यांना एक लाखाची लीड हे  वाढदिवसाचे गिफ्ट देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी करा. जिल्ह्यातील दोन्ही जागा या प्रचंड बहुमताने निवडून येतील हा माझा विश्वास आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथील प्रचार सभेत लगावला.

रावेर मतदार संघात उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार सभेसाठी फडणवीस जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा खर्पूर समाचार घेतला.

फडणवीस पुढे म्हणाले, ही निवडणूक काही छोटी मोठी निवडणूक नसून ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. कोणाच्या हातात हा देश सुरक्षित असेल ही ठरवण्याची ही निवडणूक आहे. कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतो हे समजण्याची निवडणूक आहे. सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे. आज देशांमध्ये या निवडणुकीमध्ये दोन भाग झाले आहेत. दोन ध्रुव तयार झाले आहेत. एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे. या महायुतीमध्ये शिवसेना आहे. राष्ट्रवादी आहे. रिपाई रासपा मनसे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या संघटना आहेत. एक मजबूत महायुती मोदीजींच्या नेतृत्वात तयार केली आहे. तर दुसरीकडे कोण आहेत. राहुल गांधी आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथील प्रचार सभेत लगावला.

दरम्यान भुसावळ येथे येण्या आधी त्यांनी अहमदनगर येथे आपला प्रचार केला. यावेळी बोलतांना ते म्हणले, भाजपा किंवा महायुतीने कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही करणार नाही. रोहित पवारांना जे अश्रू अनावर झाले त्याबाबत मी काय बोलायचं जनताच बोलते आहे.. भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याबाबत जनताच निर्णय घेईल. बारामतीत सगळ्यांनी शांतता राखावी आणि इमोशनल अत्याचार करु नये असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे..

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्यपद्धती उद्धव ठाकरेंनी गुंडाळून ठेवली आहे.. त्यामुळेच त्यांच्या समोर अल्ला हो अकबरचे नारे सुरु आहेत.. त्यांच्यासमोर टिपू सुलतान जिंदाबादचे नारे सुरु आहेत.. जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं आहे.. तसंच त्यांनीही जी बाळासाहेबांची परंपरा होती माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणायचे ते देखील उद्धव ठाकरेंनी म्हणणं सोडून दिलं आहे.. असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसंच विजय वडेट्टीवार जे बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत. का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे..

“विजय वडेट्टीवर जे बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत. का? काही मतांच्या लांगूलचालनासाठी उद्धव ठाकरे तोंड शिवून बसले आहेत.. उज्ज्जवल निकम यांच्याविषयी बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका मांडली होती, त्यांचं अभिनंदन केलं होतं. आज उद्धव ठाकरेंचे पार्टनर याच उज्ज्वल निकमांवर टीका करत आहेत.. पण मतांसाठी उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत.. ” असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.