एकाच कुटुंबातील तिघी पुरुषांचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सुळे ता. आजरा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार ता. ७ रोजी घडली आहे. यामध्ये अरुण बचाराम कटाळे (५५),  उदय बचाराम कटाळे (५२) या सख्या भावांचा व जयप्रकाश अरुण कटाळे (१३)या तिघांचा मृत्यू झाला तर सुदैवाने ऋग्वेद अरुण कटाळे या दुर्घटनेतून बचावला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी,  यात्रेनिमित्त कटाळे कुटुंबीय एकत्र कपडे धुण्यासाठी गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीच्या बंधाऱ्याजवळ सकाळी लवकर गेले होते. कपडे धुऊन झाल्यानंतर सर्वजण नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले. यावेळी त्यांना पोहताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने सर्वजण पाण्यात बुडू लागले. त्यातच तिघांचा बुडून मृत्यू झाला. मात्र ऋग्वेद अरुण कटाळे याला वाचवण्यात यश आले.

दोघांचे मृतदेह मिळाले.

या घटनेतील मयत अरुण बचाराम कटाळे,  उदय बचाराम कटाळे या दोघांचे मृतदेह मिळाले असून जयप्रकाश अरुण कटाळे याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. यात्रा काळामध्ये ही घटना घडल्याने सुळे गावात एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान प्रत्यक्षदर्शी हारूर येथील तरुण अंकुश अशोक चव्हाण याला सर्वजण बुडताना दिसले. त्याने जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या ऋग्वेदला पाण्यातून काढून त्याला वाचवले. एका देवदूता सारखे येऊन त्याला ऋग्वेदला वाचवण्यात यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.