मेळाव्यात भांडण सोडविल्याचा राग ; मारहाण करीत तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव : – येथे आयोजित मेळाव्यात भांडण सोडविल्याच राग आल्याने एका टोळक्याने अब्दुल हनीफ पटेल (वय ३१, रा. रजा कॉलनी, शेरा चौक) या तरुणाच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यात येऊनत्याच्या घरातील साहित्याची तोडफोड करीत त्यांच्या घरावर दगडफेक केली. ही घटना दि. ११ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेरा चौकातील रजा कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शेरा चौकातील रजा र्कालनीत अब्दुल हनीफ पटेल हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. ११ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरातील शेरा चौकात ईद निमित्त मेळावा लागला होता. या मेळाव्यात एक जण दारु पिवून आल्याने त्याच्यासोबत तौसिफ मुलतानी व इबु मुलतानी भांडण करीत होते. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी अब्दुल पटेल हा गेला होता. भांडण सोडविल्यानंतर तो रात्री ११ वाजता घरी जेवण करीत असतांना सुमारे वीस ते पंचवीस जणांचे टोळके त्याच्या घरी आले. यावेळी तौसिफ मुलतानी याने अब्दुल यांना शिवीगाळ व मारहाण करु लागला. यावेळी त्याची पत्नी व आई त्याला अडविण्यासाठी आले असता, त्यांना देखील मारहाण केली.

घरातून बाहेर पडल्यानंतर टोळक्याने अब्दुल पटेल यांच्या दुचाकीची तोडफोड करीत नुकसान केले. तसेच याठिकाणी लोकांची गर्दी जमा होवू लागल्याने टोळक्याने पटेल यांच्या घरावर दगडफेक केली. यामध्ये अब्दुल पटेल, मेहमूद पटेल, यास्मीन महेमूद पटेल, सईदा जाबीर पटेल, शाहिद लतिफ पटेल यांना गंभीर दुखापत झाली, पोलिसांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते.

उपचारानंतर अब्दुल पटेल यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार आसीम बल्लू उर्फ काल मुलतानी, इबुल मुलतानी, तौसिफ मुलतानी, आसिफ मुलतानी, नदीम मुलतानी, नवाज मुलतानी, सोहेल अकील मुलतानी, मुसा रमजान खान, रमजान खान मुलतानी, जाबीद उर्फ उर्फ विलन याच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.