बदल्यांच्या खेळात ठेका रद्द करण्याचा खेळखंडोबा!

0

रुग्णवाहिका चालक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत
जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबर्इ येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला असतांना हा प्रस्ताव आता ‘बदल्यां’च्या कचाट्यात सापडला आहे. खरेदी कक्षाचे सहसंचालक डॉ. उमेश शिरोडकर यांची या विभागातून बदली झाली असून प्रस्तावाचा प्रवास पुन्हा लांबला आहे. सतत होणाऱ्या या अन्यायाला अधिकारी दाद देत नसल्याने रुग्णवाहिका चालक आता लोकसभा निवडणुकीवर परिवारासह बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून संबंधित ठेकेदारावर कारवार्इ करावी यासाठी रुग्णवाहिका चालक मागणी करुनही त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात येत असून आता रुग्णवाहिका चालकांचा संयम सुटत असून ते लोकसभा निवडणुकीवर परिवारासह बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. आयुक्त नितीन अंबाडेकर यांच्याकडेही आयुक्तपदाचा प्रभारी चार्च असून तेही चार्च सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या या प्रभारी कारभारामुळे रुग्णवाहिका चालकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.

ऐकमेकांकडे अंगुलीनिर्देश
चार महिन्यांपासून रुग्णवाहिका चालक आपल्या हक्काच्या मानधनासाठी खेटे मारत असतांनाही त्यांच्या मागणीकडे एकही अधिकारी लक्ष केंद्रीत करीत नसल्याने आता रुग्णवाहिका चालकांचा संयम सुटत असून ते कठोर निर्णय घेण्याच्या तयारत आहेत. येत्या चार दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर ते उग्र आंदोलन उभारणार आहेत. अधिकारी या प्रकरणी आता ऐकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत असल्याने संपात वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.