आव्हाने रस्त्यावर शेतात एकाचा खून; खुनाच्या घटनेने जळगाव पुन्हा हादरले…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जळगाव शहरात गुन्हेगारांना जणू कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही भय राहिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच असोदा शिवारात तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव खुनाच्या घटनेने हादरले आहे. आव्हाणे रस्त्यावर असलेल्या लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या जिनिंग मागील शेतात एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा यांच्या मालकीची लक्ष्मी जीनिंग आहे. त्याच जिनींगमध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या एका तरुणाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास जिनींग मागील भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीस आले. शेतात चारा कुट्टी पसरलेल्या प्लास्टिक फटवर डोक्यावर मागील बाजूस तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे.

यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे, श्वान पथक, ठसे तज्ञ आणि कर्मचारी पोहचले आहेत. मयताचे नाव सुरेश परमसिंग सोलंकी ( ४०) रा.गेहिज खेमला, जि.सेंधावा, मध्यप्रदेश असे असून मृताजवळ काही वस्तू आढळून आल्या असून याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. सोबतच पोलीस परिसरातील सीसीटिव्ही च्या माध्यमातून फुटेज, श्वान पथकाने दाखवलेला मार्ग आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.