नैराश्यातून कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील चोरवड येथील एका २७ वर्षीय तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातील नापिकीची नैराश्यातून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.

पारोळा तालुक्यातील चोरवड येथील हेमराज शेखर पाटील (वय २७, रा. चोरवड ता.पारोळा) यांच्याकडे सुमारे पाच बिगे शेती आहे. यंदा शेतात कापसाची लागवड केली होती. कापसाच्या पिकासाठी त्यांनी पीक कर्जही घेतले होते, परंतु यावर्षी तालुक्यात कधी जास्त तर कधी कमी व दीर्घकाळ खंड पडलेल्या पावसामुळे शेतात नापिकी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने पीक कर्ज कसे फेडायचे, घर संसार कसा चालवायचा या नैराश्यातून त्यांनी दिनांक १० रोजी आपल्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत त्यांनी आपले चुलत भाऊ यांना ही घटना फोनवरून सांगितल्यावर तात्काळ नातेवाईकांनी धाव घेत त्यांना पारोळा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दि. १३ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन वर्षाची मुलगी आहे. याबाबत नितीन सुभाष पाटील यांनी पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.