किरकोळ कारणावरून भाऊ बहिणीला मारहाण

0

जळगाव ;- किरकोळ कारणावरून हमाल काम करणाऱ्या तरूणासह त्याच्या बहिणीला काहीही कारण नसतांना जमावातील ५ जणांनी लाकडी दांडक्याने हाताला व पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १ मे रोजी दुपारी ११ वाज ता कानळदा रोडवरील नारायण स्वामी मंदीराजवळ घडली आहे. तसेच तरूणाच्या घरावर दगडफेक करून जीवेठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी गुरूवार २ मे रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशिक ईश्वर जाधव वय २३ रा. गेंदालाल मिल जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. हमालीचे काम करून उदरनिर्वाह करतात. बुधवार १ मे रोजी रात्री ११ वाजता प्रशिक जाधव हा कानळदा रोडवरील स्वामी नारायण मंदीराजवळ असतांना त्याला तन्या (पुर्ण नाव माहित नाही) याच्यासह अनोळखी चार जणांनी काहीही कारण नसतांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच प्रशिकच्या बहिणीला देखील मारहाण केली. या मारहाणीत प्रशिकच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत केली. आपला जीव वाचवत घरात घुसल्याने जमावातील ५ जणांनी घरावर दगडफेक करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर गुरूवार २ मे रोजी मध्यरात्री १ वाजता शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार तन्या (पुर्ण नाव माहित नाही) याच्यासह अनोळखी चार जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.