शेतकरी आत्महत्येची ४ प्रकरणे पात्र

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शेतकरी आत्महत्या समितीची बैठक आज झाली. त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची तेरा प्रकरणे शासकीय मदतीसाठी मंजूरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर एकूण प्रकरणे आठ प्रकरणे फेरचौकशीसाठी पाठविण्यात आली. एक प्रकरण नामंजूर करण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, कृषी विभाग, पोलिस विभाग, समितीचे सदस्य उपस्थित होते. पात्र शेतकऱ्याचे नाव – अमरसिंग मांगो वंजारी (रा. चहुत्रे ता. पारोळा), हर्षल गजानन चौधरी (रा. ओझर बुदु्क, ता. जामनेर), प्रदिप प्रभाकर तुके (रा. कळमसरा, ता. पाचोरा), सचिन प्रकाश पाटील (रा. साळवा ता. धरणगाव).

Leave A Reply

Your email address will not be published.