धक्कादायक; मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीचाही मृतदेह सापडला…

0

 

गुरुग्राम, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

गुरुग्रामच्या DLF फेज-3 भागात असलेल्या फ्लॅटमध्ये एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला आहे. तेव्हापासून गुरुग्राम पोलीस २३ वर्षीय महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, महिलेचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडला होता आणि तिचे दोन वर्षांचे मूल शेजारी बसून रडत होते. महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून करून महिलेचा पती फरार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाला घराचे कुलूप बंद दिसले आणि दरवाजा तोडला असता त्यांनी पाहिले की महिला रक्ताने माखलेली होती आणि तिचे मूल मृतदेहाजवळ बसून रडत होते. पीडित लक्ष्मी शर्मा ही मूळची आग्रा येथील रहिवासी असून तिचा विवाह गौरव शर्मासोबत झाला होता. पोलिसांनी सांगितले की, दोघेही सहा महिन्यांपूर्वी या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. ही हत्या आदल्या दिवशी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (DLF) विकास कौशिक यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत आणि महिलेच्या बेपत्ता पतीला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत.

मात्र, आता गाझियाबादमधील कौशांबी मेट्रो स्टेशनवरून महिलेच्या पतीने उडी मारून आत्महत्या केल्याचीही बातमी समोर आली आहे. 30 वर्षीय गौरव शर्मा पत्नीच्या हत्येनंतर फरार झाला होता. रविवारी पत्नीचा खून झाला होता. मृत गौरव शर्मा हा मूळचा आग्रा येथील रहिवासी होता. जो सध्या डीएलएफ गुडगावमध्ये खाजगी नोकरी करत होता. सोमवारी सकाळी 11.45 च्या सुमारास कौशांबी मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. काल पत्नी लक्ष्मी शर्माची हत्या करून तो फरार झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.