जळगावातून अल्पवयीन तरुणीला पळविले

0

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने कुठले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्रकार १४ एप्रिल रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी गुरूवारी २ मे रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.