कांदा प्रतिकिलो २५ रुपये दरात मिळणार ; केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

0

मुंबई ;- नवरात्रोत्सवापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये कांदा सरासरी २० ते ४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली-एनसीआरसह वेगवेगळ्या शहरांमध्ये २५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.

नवीन खरीप कांदा सुमारे दोन महिन्यांनंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढतच राहण्याची शक्यता आहे. राज्यभरात १० दिवसांपूर्वी कांद्याचा सरासरी भाव ३५ रुपये किलो होता, तो आता ४५ रुपये किलो झाला आहे. बाजारात चांगला भाव मिळत असून कांदा उत्पादकाला आनंद आहे. मात्र, ग्राहक महागाईमुळे त्रस्त आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.