पी. एम. किसान सन्मान निधीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन

0

मोरगांव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा रावेर व महाराष्ट्र शासन महसूल विभाग व कृषी विभाग रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम.किसान सन्मान निधी योजनेतील लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठीचे शिबीर कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी पी एम किसान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे उद्या दिनांक 13 मार्च 2024 बुधवार रोजी सकाळी 10 वाजेपासून शिबिराची सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी शिबीराला येतांना आणायची कागदपत्रे –

– PM किसान भूमि अभिलेख नोंदी (LAND SEEDING ) करणे कामी कागदपत्रे

1) तलाठी पात्र आहवाल

2) फेरफार नोंदी

(खरेदी नोंद किंवा वारसाची नोंद )

PM किसान E KYC

1)आधार कार्ड

2) मोबाइल (आधार लिंक मोबाईल नंबर)

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.