बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला स्मिता वाघ यांनी दिली भेट

0

जळगाव ;- लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेले सर्वात सुंदर असे लेणे आहे. बहिणाबारइंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे जतन करून ठेवल्या आहेत. बहिणाबार्इंच्या ओव्या असतील किंवा त्यांच्या वस्तू असतील त्या सतत प्रेरित करत असतात. जळगाव शहराला देखील विकासाच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे.

भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जुन्या जळगावातील बौद्ध विहार तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेशाम चौधरी, दीपक सूर्यवंशी, माजी उपमहापौर सुनील ख़डके, कैलास सोनवणे, ज्योती निंभोरे, अरविंद देशमुख, अमित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, आशुतोष पाटील, मुकुंद मेटकर, आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अमित भाटिया, किशोर चौधरी, सरोज पाठक, चंदन महाजन, डॉ. विरन खडके, अमित काळे, सुचिता हाडा, दिपमाला काळे, प्रकाश बालाणी, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, दीप्ती चिरमाडे, भाग्यश्री चौधरी, रंजना वानखेडे, लीला चौधरी, मुकुंदा सोनवणे, ललित बडगुजर, चेतन सनकत, जितेंद्र मराठे, मयूर कापसे, प्रवीण कोल्हे, महेश पाटील, आनंद सपकाळे, नितीन इंगळे, महेश जोशी, अजित राणे, राहुल घोरपडे, जयेश ठाकूर, पियुष कोल्हे, शक्ती महाजन, विकी सोनार, रियाझ शेख, मयूर शिंपी, मिलिंद चौधरी, धनंजय चौधरी आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.