धक्कादायक; लेकासाठी वृद्ध पित्याने काढाल ४० लाखाचं कर्ज; परदेशात जाताच मुलाने नात तोडलं, माता- पित्याची आत्महत्या

0

 

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, सुखासाठी आई- वडिल आयुष्यभर कष्ट घेतात. मुलांनी शिकून मोठं व्हावे, नाव कमवावे आणि लेकाने म्हातारपणी आधाराची काठी व्हावं हीच प्रत्येक माता- पित्याची इच्छा असते. मात्र गुजरातमधून एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गुजरातमधील चुन्नीभाई गेडिया (६६) आणि मुक्ता (६४) या दाम्पत्यांने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येआधी त्यांनी लिहलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. ज्यामध्ये मुलासाठी ४० लाखांचे कर्ज फेडता न आल्याने तसेच मुलगा बोलत नसल्याच्या तणावातून हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

पियुष असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. तो फायनान्स व्यापार करायचा. या व्यापारात त्याला मोठे नुकसान होऊन तो कर्जबाजारी झाला. त्याचे कर्ज फेडण्यासाठी त्याच्या वडिलांनी ४० लाख रुपये उसने घेतले होते. मुलगा कॅनडाला जाऊन पैसे परत करेल, अशी त्यांना आशा होती. मात्र कॅनडाला जाताच त्याने आपल्या माता- पित्याशी बोलणे कमी केले तसेच त्यांनी संपर्क केला तरी बोलणे टाळू लागला. डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि मुलाचा विरह माता-पित्याला सहन झाले नाही, याच तणावातून दोघांनी आत्महत्या केली.

सुसाईड नोट मध्ये लिहिले होते…

“माझे वय आता ६६ वर्ष झाले आहे. मी कामही करू शकत नाही. माझा कोणताही व्यवसाय नाही, त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे. पियुषचे कर्ज फेडण्यात मी कर्जबाजारी झालो. मी व्याज म्हणून ३५ लाख रुपये आणून त्याला दिले. पियुष गेल्या 4 वर्षांपासून कॅनडामध्ये राहत आहे. या काळात त्यांनी मला एकदाही फोन केला नाही. मी पियुषला दोनदा व्हिडिओ कॉल केला, पण त्याने फोन उचलला नाही. कर्जदार माझ्यावर कोणताही दबाव टाकत नाहीत. मी माझ्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा ऋणी आहे, पण आता मला लाज वाटते, असे त्यांनी या चिठ्ठीमध्ये लिहून दाम्पत्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.