आईच्या विजयासाठी मुलगी उतरली मैदानात!

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क-

भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे गेल्या दहा वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यंदा त्यांना तिसऱ्यांदा भाजपाने उमेदवारी दिली असून आर्इच्या विजयासाठी रक्षा खडसेंची कन्या क्रिशिका ही देखील प्रचाराच्या मैदानात उतरली आहे. क्रिशिका प्रचार रॅलीत सहभागी होवून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत आहे.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते सूनबाई रक्षा खडसे यांच्या तिसऱ्या विजयासाठी मैदानात उतरलेले आहेत. भाजप प्रवेशाअभावी उघड प्रचार करू शकत नसले, तरी त्यांनी गावोगावी जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यातच खासदार रक्षा खडसे यांची मोठी मुलगी क्रिशिका देखील मैदानात उतरली आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या माहेरची मंडळी देखील या पूर्वीच मतदारसंघात भाजपाच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. खासदार रक्षा खडसे यांना हॅट्टिक खासदार बनवण्यासाठी मुलगा गुरुनाथ आणि मुलगी क्रीशिका दोघेही आईसोबत प्रचारामध्ये उतरलेले आहेत. आईला विजय खेचून आणण्यासाठी मतदारांसमोर मतांचा जोगवा मागत आहेत. रक्षा खडसे या तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि त्यांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधत गावोगावी जाऊन प्रचार केला. त्यांच्याच प्रचारामध्ये मुलगा व मुलगी देखील सहभागी झाले आहेत.

आईच्या विजयासाठी मुले मैदानात
मुलगी क्रिशिका खडसे ही दहावीला असून तिने परीक्षा देखील दिली आहे. परीक्षा संपल्यानंतर आईच्या प्रचारासाठी ती मैदानात उतरली आहे. रावेर येथे खासदार नवनीत राणा यांचा रोड शो झाला. या रोडशो मध्ये देखील क्रिशिका सहभागी झाली होती आणि मतदारांना अभिवादन करून आर्इंना विजयासाठी विनंती देखील करत होती. रक्षा खडसे यांचा मुलगा गुरुनाथ देखील बऱ्याच वेळा प्रचारात दिसून येत आहे. आर्इच्या विजयासाठी मुलांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.