महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

0

लोकशाही न्युज नेटवर्क –

काही दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने असह्य करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून राज्यातील १९ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्याला कोणताच अलर्ट जारी करण्यात आला नाहीय. मात्र येत्या १२ मेला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या १९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
आज हवामान विभागानं राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूरमध्ये आज वीजांच्या गडगडासह मुसळधार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
११ मे रोजी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा,छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.