किरकोळ कारणावरुन तरुणाला ठार मारण्याची धमकी

0

जळगाव : रस्त्याने पायी जात असलेल्या तरूणाला किरकोळ कारणावरून एकाने शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शहरातील गेंदालाल मिल गेटजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राजमालती नगरात राहणारा फैजान राजू पटेल हा तरूण शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फैजान पटेल हा

बहिणीसोबत गेंदालाल मिल गेट जवळून पायी जात होता. त्यावेळी राज अजय सुरवाडे रा. राजमालती नगर याने किरकोळ कारणावरून फैजान पटेल याला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर फैजान याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.