रावेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगार हद्दपार

0

रावेर ;- : लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील रसलपूर येथील दोन सराईत गुन्हेगारांना ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात करण्यात आल्याचा आदेश फैजपूर उपविभागागीय दंडाधिकारी यांनी काढले आहे. त्यांच्यावर चोरी, जबर दुखापत, प्राण्यांची कत्तल करणे, विनयभंग करणे आदी गुन्हे दाखल आहेत.

रावेर पोलीस ठाणे हद्दीतील रसलपूर गावातील शेख हुसेन शेख हसन व शेख मुस्ताक उर्फ टिंग्या शेख ईसाक यांना आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवादरम्यान जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश फैजपूर उपविभागीय दंडाधिकारी देवयानी यादव यांनी काढला आहे. संशयीतांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, राहुल परदेशी, समाधान ठाकुर, भारत पाटील यांनी तयार केला होता. आदेशाची अंमलबजावणी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, समाधान ठाकुर, भारत पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.