गुडन्यूज ! IT कंपनी देणार 10 हजार नोकऱ्या

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे.. आता आयटी कंपन्या फ्रेशर्सना 10 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार आहे. सर्व मोठ्या आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र मार्च तिमाहीत HCL टेकच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2,725 ने वाढली आहे. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीनंतर देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 2 लाख 27 हजार 481 झाली आहे. यापूर्वी, 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीनंतर, एचसीएल टेकच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाख 24 हजार 756 होती.

आता आयटी कंपनी एचसीएल टेक तरुणांना मोठी संधी देणार आहे. कंपनीने गेल्या वर्षीप्रमाणेच 2024-24 या आर्थिक वर्षात 10,000 हून अधिक फ्रेशर्सची भरती करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे तरुणांमध्ये उत्साह वाढला आहे. संपूर्ण उद्योगात नोकऱ्या कमी होत असताना तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. देशातील सर्वात मोठ्या पाच आयटी कंपन्यांमध्ये, एचसीएल टेक वगळता, कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. सर्वात मोठी IT कंपनी TCS असो किंवा विप्रो असो, कर्मचाऱ्यांची संख्या अलीकडच्या काही महिन्यांत कमी झाली आहे.

IT क्षेत्रातील सर्वात मोठी आणि देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी TCS ने मार्च तिमाहीत 1,759 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे, तर TCS कर्मचाऱ्यांची संख्या संपूर्ण आर्थिक वर्षात 13 हजार 249 ने कमी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातही आयटी कंपन्यांना कमकुवत मागणीचा सामना करावा लागला. येत्या वर्षासाठी कंपन्यांचे अंदाजही चांगले नाहीत. इन्फोसिसचा असा विश्वास आहे की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या चालू आर्थिक वर्षात त्यांच्या महसुलात 1 ते 3 टक्क्यांनी किरकोळ वाढ होऊ शकते. जून तिमाहीत विप्रोच्या महसुलात 1.5 टक्के घट होण्याची अपेक्षा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.