अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यासोबतच न्यायालयाने आणखी एक मोठा निर्देश दिला आहे. न्यायालयाने काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.

2 जूनला आत्मसमर्पण करावे लागेल – कोर्ट

अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाकडे ५ जूनपर्यंत जामीन मागितला होता. मात्र, न्यायालयाने म्हटले, आपण कोणत्याही सामान्य रेषा काढू नयेत. केजरीवाल यांना मार्चमध्ये अटक करण्यात आली होती आणि अटक आधी किंवा नंतरही होऊ शकली असती. आता २१ दिवस इकडे कि तिकडे काही फरक पडणार नाही. अरविंद केजरीवाल २ जूनला आत्मसमर्पण करतील.

आता पुढील प्रक्रिया काय होणार?

अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ट्रायल कोर्टाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर ट्रायल कोर्टाकडून सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाकडे पाठवला जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा ट्रायल कोर्टाचा आदेश तिहारला जातो तेव्हा सुटकेचे पत्र तिथे पोहोचल्यानंतर प्रक्रियेसाठी दोन तास लागतात. ट्रायल कोर्टाकडून सुटकेचा आदेश आज वेळेवर तिहारला पोहोचला तर दोन तासांच्या प्रक्रियेनंतर केजरीवाल यांची सुटका होईल. तिहार तुरुंगात दररोज येणारे सर्व सुटकेचे आदेश सुमारे 2 तासात निकाली काढले जातात.

ईडीच्या युक्तिवादांकडे दुर्लक्ष

गेल्या गुरुवारी, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. निवडणूक प्रचार करणे हा मूलभूत अधिकार नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. दुसरीकडे, केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकाने ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र, ईडीच्या सर्व युक्तिवादांकडे दुर्लक्ष करत न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.