बेअकली माणसा तेव्हा लाज नाही वाटली; मोदींच्या नकली संतान टीकेवर ठाकरेंचा घणाघात…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर बोलतांना मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंवर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेनेनंतर नकली संतान अशी टीका केली. दर्म्त्यान आता मोदींच्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवत त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदीजी माझ्याशी लढा. माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही कुठे पण राहा. तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले होतात तुम्ही, बाळासाहेबांच्या नकली मुलाला मी विचारात आहे. नकली?” हा माझा अपमान नाही, तर देवतासमान माझी आई आणि माझे वडील बाळासाहेब यांचा अपमान आहे.”, आज जे मोदी मला नकली मुलगा म्हणत आहे. 2014 आणि 2019 मध्ये माझी स्वाक्षरी घेताना लाज नाही वाटली का. अश्या तीव्र शब्दांमध्ये ठाकरेंनी  मोदींवर टीका केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले, आता 17 मे रोजी हे लोकं मुंबईतील शिवाजी पार्कवर येतील. बाळासाहेबांच्या स्मारकावर पोहचतील. तिथे नाक रगडतील. मंचावर बाळासाहेबांच्या आठवणीत रडतील. हे नकली, बनावट लोक आहेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी मोदींवर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.