मुंबईत दारूच्या नशेत मुलींचा हायव्होल्टेज ड्रामा; चक्क पोलिसाला चावले…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मुंबईला लागून असलेल्या विरार शहरात दारूच्या नशेत मुलींचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दारू पिऊन बेभान झालेल्या तीन मुलींनी गोंधळ घातला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनाही त्यांनी सोडले नाही. मद्यधुंद मुलींनी पोलिसांच्या हाताला चावा तर घेतलाच शिवाय त्यांना शिवीगाळही केली. त्यानंतर अर्नाळा पोलिसांनी तिघांनाही अटक केली.

नशेत मुलींचा हाय व्होल्टेज ड्रामा

विरार पश्चिम येथील गोकुळ टाऊनशिपमधील एका रेस्टॉरंट-बारमध्ये ही धक्कादायक घटना घडली. काही मुली दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर महिला पोलिस अधिकारी उत्कर्षा वंजारी इतर पोलिस अधिकारी आणि हवालदारांसह घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांना 3 मुली दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे समजले. दारूच्या नशेत एका तरुणीने पोलिस अधिकाऱ्याचा गणवेशही ओढला घेतला. तिने पोलिसाला शर्टाच्या कॉलरने पकडून त्यांना ओढले. पोलीस अधिकाऱ्याने मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांच्या कोपरात चावा घेतला. एका मुलीने पोलीस अधिकारी उत्कर्षा यांचे केसही ओढले.

शिवीगाळ करून पोलिसांना धक्काबुक्की केली

पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हवालदार पुढे येताच गोंधळ घालणाऱ्या तरुणीने त्यांनाही धक्काबुक्की केली. तिने महिला सुरक्षा रक्षकाचा टी-शर्ट फाडला. तिसऱ्या आरोपीनेही त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. नशेत असलेल्या काव्याने पोलिस हवालदार मोराळे यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर लोखंडी बादलीने वार केल्याने प्रकरण आणखी चिघळले. मात्र, तिन्ही मुलींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या घटनेबाबत अर्नाळा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.