हायटेक शेतीचा नवा हुंकार : भाग दोन

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने केळीची राजधानी ही ओळख टिकवायची असेल तर उच्चतंत्रज्ञान तंत्र आत्मसात करून अंमलबजावणी आवश्यक

0

 

लोकशाही संपादकीय विशेष

 

  • पारंपारिक पद्धतीने केळीची शेती करणे बंद करावे
  • केळीची लागवड टिशू कल्चर रूपानेच करावी
  • केळीचा उत्पादन काळ १२ ते १६ ऐवजी ९ ते ११ महिने असावा
  • पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारेच पाणी द्यावे
  • निर्यातक्षम दर्जेदार केळी वाणाची लागवड करून उत्पादन वाढवावे
  • निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठीच्या तंत्राचा वापर करावा
  • निर्यात वाढीच्या सोयी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक
  • केळी उत्पादक शेतकऱ्यांनी संघटना करून मार्केटिंग करावे

 

जैन उद्योग समूहाच्या वतीने आयोजित हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचा रविवार दिनांक 14 जानेवारीला समारोप होणार आहे. गेल्या महिन्याभर चाललेल्या कृषी महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत द्यावयाच्या विविध पिकांसाठी आता यापुढे उच्चतंत्राचा वापर करणे क्रमाप्राप्त आहे. त्यासाठी जैन हिल्स वरील चार एकर क्षेत्रात हायटेक पद्धतीचा वापर करून विविध पिकांचे प्रत्यक्ष पाहणी करून तज्ञांवर त्यावर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा लाभ महाराष्ट्रसह देशाच्या विविध राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी घेतला. उच्चतंत्र्याची अंमलबजावणी केल्याशिवाय यापुढे शेतकऱ्यांना शेती करणे परवडणारे नाही. यासाठीच हायटेक शेतीचा नवा हुंकार हे कृषी महोत्सव आयोजिले होते. एक महिनाभर चाललेल्या या कृषी महोत्सवास हजारो शेतकऱ्यांनी भेट तर दिलीच परंतु देशातील कृषी विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सुद्धा भेट देऊन त्याचा लाभ घेतला. कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी या महोत्सवाचे जोरदार स्वागत केले. विद्यापीठात मिळणाऱ्या पुस्तकी ज्ञानाला प्रात्यक्षिकाची जोड मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होता.

 

हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवात विविध पिकांच्या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती उपलब्ध असून यंदाच्या कृषी महोत्सवात जळगाव जिल्ह्याचे मुख्य नागरिक नगदी पीक केळी या संदर्भात विशेष लक्ष केंद्रित करून केळीच्या विविध जातीन संदर्भात प्रत्यक्ष तज्ञांद्वारे माहिती उपलब्ध होती. त्यामुळे जळगाव जिल्हा हा भारतात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी जळगावच्या केळी उत्पादकांसमोर आता इतरत्र केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण देण्यासारखे आहे.

 

सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून केळीची लागवड झपाट्याने वाढली असून जळगाव जिल्ह्यापेक्षा जास्त केळीची निर्यात सोलापूर जिल्ह्यातून होते. अनेक वर्षापासून जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन होत असले तरी निर्यातीत आपला जिल्हा मागे का? याचे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. जळगाव जिल्हा पारंपारिक केळी उत्पादनाचा जिल्हा असून जिल्ह्यात ७५ हजार हेक्टर वर केळीचे पिक घेतले जाते. मागून आलेल्या सोलापूर जिल्ह्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीचे पीक घेतले जाते. दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यातील केळी पिकाचे क्षेत्र वाढण्यामागचे कारण काय? तर तिथला शेतकरी उच्चतंत्राचा वापर करून केळीचे उत्पादन घेतो. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता उच्चतंत्राचा वापर करून केळी उत्पादन घेणे गरजेचे आहे. केळीच्या मार्केटिंग संदर्भात सोलापूर जिल्ह्याला जो फायदा मिळतो तो जळगावला मिळत नाही. म्हणून केळीच्या मार्केटिंगसाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा जळगावच्या केळी उत्पादकांना भावाच्या संदर्भातील अडत दाराचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर होणे आवश्यक आहे.

 

हायटेक शेतीचा नवा हुंकार हे जैन उद्योग समूहाच्या वतीने आयोजित महिनाभराचे कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना आहे. यात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली. ज्या ज्या क्षेत्रात जे जे मुख्य पीक आहे, त्या पिकाची उच्चतंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर पिकाचे भरगोस उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. त्यात कांदा, टोमॅटो, पपई, संत्रा, मोसंबी, आंबे, चिकू, भाजीपाला, ऊस आदी विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे हे कृषी महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांसाठी उच्चतंत्रज्ञानाची शिदोरी म्हणता येईल. “मी जगाचा पोशिंदा” अशा प्रकारचे फलक कृषी महोत्सवात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांच्या स्वाभिमान उंचावणारे होते. तर “जैन शेतकऱ्यांचा नादच खुळा” या टोमॅटो पासून बनवलेल्या रंगीत फलकाने शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होत होता..

 

केळी तज्ञ डॉक्टर के बी पाटील म्हणतात…

जैन उद्योग समूहातील केळी तज्ञ डॉक्टर के बी पाटील यांच्याशी बातचीत केली. तेव्हा ते म्हणाले.. “निसर्गाच्या लहरीपणावर अविकारी वादळ, अवकाळी पाऊस, अति उष्णतापमान आणि अति थंडीपासून केळीचे संरक्षण करणाऱ्या तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच किडीपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार नाही. तसेच केळीच्या निर्यातीबाबत सोलापूर जिल्ह्यातून मुंबई जाणाऱ्या कंटेनर चे भाडे फक्त ३० हजार रुपये इतके आहे. तर जळगावहून भाडे ६५ हजार रुपये इतके द्यावे लागते. त्यामुळे केळी निर्यात परवडत नाही. त्यासाठी रेल्वे यंत्रणेचा सामूहिकपणे वाहतुकीसाठी वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे जळगावच्या केळी निर्यातीवर परिणाम होतोय. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात केळी साठवण्यासाठी शीतगृहाची मोठ्या प्रमाणावर उपलब्ध उपलब्धता आहे, ती जळगावला नाही हे वास्तव आहे.

केळीच्या विविध जाती

केळीच्या विविध जातींची त्यांच्या उपयुक्ततेनुसार माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष त्याच्या केळीच्या पिकाला समोर शेतकऱ्यांना माहिती दिली. ग्रँटनाईट या जातीची केळी ३६५ दिवसात केव्हाही घेता येते, तर इलाकी, पूवन, बन्सल नेंद्रन आणि लाल केळीच्या उपयुक्ततेबद्दल शेतकऱ्यांना जैन उद्योग समूहातील एक केळी तज्ञ राहुल भारंबे हे माहिती देत होते. नेंद्रन केळी ही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून निर्यातक्षम सुद्धा आहे. विविध विटामिन या केळीत असल्याने तिला मागणी जास्त आहे. तसेच इतर पाच प्रकारच्या केळीमधील उपयुक्तता सांगितले. त्यात इलाकी केळी ही आकाराने छोटी मात्र खायला गोड असते. पुवन केळी गोड आंबट चवीची सुहासिक असते. बंसल केळी ही भाजीसाठी उपयुक्त असते. नॉर्थ ईस्ट मध्ये याला मागणी आहे. नेंद्रन केळी ही वेफर्स साठी अत्यंत उपयुक्त असून मोठ्या मोठ्या शहरात या वेफर्सला मोठी मागणी असते. या सर्व पाच प्रकारच्या केळी ९ ते ११ महिन्यात काढणीला येतात. केळी उत्पादक शेतकरी अधिक माहिती तज्ञांकडून घेऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.