इराण समर्थक हौथी बंडखोरांवर १६ ठिकाणांवर हल्ले

0

येमेन ;- येमेनमध्ये आश्रय घेतलेल्या इराण समर्थक हौथी बंडखोरांवर शुक्रवारी जोरदार हवाई हल्ले करीत सुमारे १६ हून अधिक ठिकाणांना निशाणा बनवले. या कारवाईत ५ हौथी बंडखोर ठार झाले असून ६ जण जखमी झाले. या कारवाईत बंडखोरांकडील स्फोटके, सामग्री, हवाई संरक्षण प्रणाली व शस्त्रागारांचे मोठे नुकसान झाले.

लाल समुद्रात अमेरिका व सहकारी देशांच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा आम्ही बदला घेतला असून अशा प्रकारचे हल्ले आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ठणकावले. लाल समुद्रात आंतरराष्ट्रीय समुद्री जहाजांवर हौथी बंडखोरांनी गेल्या मंगळवारी भीषण क्षेपणास्त्र हल्ले करीत अमेरिकेला डिवचले. त्यानंतर, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली व हौथी बंडखोरांवर हल्ले करण्याचे आदेश दिले.

अमेरिकेने शुक्रवारी भल्या पहाटे येमेनमधील हौथी बंडखोरांच्या १६ तळांना लक्ष्य केले. यावेळी जहाजे व लढाऊ विमानांनी लागोपाठ ७३ क्षेपणास्त्रांचा मारा केला. येमेनची राजधानी सना येथील बंडखोरांच्या तळांवर ४ बॉम्बस्फोटांचा आवाज आला. तर हौथींचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिमेकडील बंदरावर ५ शक्तिशाली स्फोट घडले. तैज व धामार शहरावरही अमेरिकेने बॉम्बवर्षाव केला. यात, ५ बंडखोर ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ‘असोसिएटेड प्रेस’च्या सूत्रांनी दिली.

अमेरिकेसोबत चर्चा करून आम्ही येमेनमधील हौथी बंडखोरांच्या तळांना निशाणा बनवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा, डेनमार्क, जर्मनी, नेदरलँड, न्यूझिलँड आणि दक्षिण कोरियाने हौथी बंडखोरांवरील कारवाईचे समर्थन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.