महाबीजच्या बिजोत्पादन अभियानात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रब्बी ज्वारी, हरभरा, गहू बियाण्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी महाबीज मार्फत जिल्ह्यात बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.‌ या अभियानात सहभागी होण्यासाठी रावेर, एरंडोल, जळगाव, पाचोरा येथील कृषी क्षेत्राधिकारी यांना संपर्क साधावा. असे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका गावात कमीत कमी २५ एकर बिजोत्पादन कार्यक्रम होणे अपेक्षीत असून एका शेतकऱ्याने कमीत कमी २ एकर क्षेत्र नोंदणी तथा पेरणी करणे अनिवार्य आहे. बिजोत्पादन योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे पायाभूत बियाण्याचा पुरवठा‌ करण्यात येणार आहे. बियाणे शुल्क, सातबारा उतारा व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत शेतकऱ्यांनी बियाणे उचल करण्यापूर्वी जिल्हा कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे.

या अभियानात सहभागी होणे व अधिक माहितीसाठी संजय देवरे – (जळगांव, जामनेर, बोदवड) संतोष गडाख (मुक्ताईनगर) श्रीमती मोहिनी जाधव (चोपडा, एरंडोल, धरणगांव) जयु गावित (पाचोरा, भडगांव, चाळीसगांव) असे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.