मुंबई विमानतळावर विमान कोसळले… विमानाचे दोन तुकडे…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मुंबई विमानतळावर खासगी चार्टर्ड विमान कोसळल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पावसात लँडिंग करताना चार्टर्ड विमान धावपट्टीवर घसरले. यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आणि आग लागली. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. यापैकी 3 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर धावपट्टी काही काळ बंद करण्यात आली होती. यादरम्यान विस्तारा एअरलाइन्सने सांगितले की, डेहराडूनहून येणारे विमान गोव्यातील मोपा विमानतळाकडे वळवण्यात आले आहे. फ्लाइट UK865 संध्याकाळी 6.15 वाजता गोव्यात उतरणार आहे.

 

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सांगितले की, विशाखापट्टणमहून मुंबईला जाणारे VSR Ventures Learjet 45 विमान VT-DBL मुंबई विमानतळाच्या धावपट्टी 27 वर लँडिंग करताना घसरले. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर होते. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. पावसामुळे दृश्यमानता 700 मीटर होती. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

 

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ने चार्टर्ड विमानाच्या क्रॅश लँडिंगबद्दल अधिकृत निवेदन जारी केले आहे. एमआयएएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “१४ सप्टेंबर रोजी मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स लिअरजेट ४५ विमान व्हीटी-डीबीएल ६ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्ससह विझागहून मुंबईला जात होते. विमान मुंबई विमानतळावरील धावपट्टीवरून घसरले. ही घटना आज घडली. साधारण 5:02 वाजता. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सीएसएमआयएची एअरसाइड टीम साइट क्लिअरन्समध्ये मदत करण्यासाठी साइटवर आहे.”

 

यापूर्वी 29 जून 2018 रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळले होते. या अपघातात सहवैमानिकाचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त विमान 26 वर्ष जुने होते. ती दुरुस्त करण्याचे काम गेले अनेक महिने सुरू होते. अपघातात जीव गमावलेल्या पायलट मारिया झुबेरीच्या पतीने देखील सांगितले की खराब हवामानामुळे चाचणी उड्डाण एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले होते, परंतु चाचणी उड्डाण दुसऱ्या दिवशी अशाच हवामानात झाले. त्यामुळे विमान कोसळले.

Leave A Reply

Your email address will not be published.