हृदयद्रावक; पोळ्यासाठी बैलाला धुत असतांना शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू…

0

 

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

बैलपोळा आला कि सर्व शेतकरी कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण संचारते. आणि तितक्याच उत्साहाने तो साजरा केला जातो. मात्र अश्यातच अकोल्यात बैलपोळ्याच्याच दिवशी एका शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बैल धुण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करोडी येथे ही घटना घडली आहे. गणेश ज्ञानदेव गेड शेतकरी यांचा मुलगा समर्थ गणेश गेड पोळ्याच्या निमित्ताने बैल धुण्याकरता शहानुर नदीतील करतवाडी रेल्वे शेत शिवारातील नदी पात्रात गेला होता. आपला बैल सगळ्यांपेक्षा चांगला दिसावा म्हणून तो बैलाला नदीच्या पाण्याने धुत होता. मात्र अचानक तेथील खडकावरून त्याचा पाय घसरला आणि सार काही संपलं. पाय घसरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ऐन पोळ्याच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच दहिहंडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तसेच मृतदेह अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.