हेलिकॉप्टरमध्ये बसताना पाय घसरल्याने ममता बॅनर्जी जखमी

0

कोलकाता ;-हेलिकॉप्टरमध्ये बसत असतांना ममता बॅनर्जी जखमी झाल्याची घटना आज २७ रोजी दुर्गापूर येथील पश्चिम वर्धमान येथे घडली . त्‍यांना किरकाेळ दुखापत झाली आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्‍यांना मदत केली. यानंतर त्‍यांनी आसनसोलचा प्रवास सुरू ठेवला आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

ममता बॅनर्जी अनेकवेळा जखमी झाल्‍या आहेत. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी त्‍यांच्‍या राहत्या घरी चालताना पडल्‍या होत्‍यह यावेळी त्‍यांच्‍या डोक्याला दुखापत झाली होती. यावेळी त्यांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते.०२१ विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचार करत असताना एक दुर्घटना घडली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.