१० वर्षांची न्यायाची प्रतीक्षा संपणार; उद्या लागणार डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा निकाल…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. ज्यामुळे दाभोलकर कुटुंबियांना आणि त्यांच्या समर्थकांना तब्बल १० वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर न्याय मिळणार आहे. या खटल्यात ५ आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आले असून उद्या हत्येच्या खटल्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या ५ जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. दाभोलकर यांच्या हत्येनंतर बंगळूरमध्ये गौरी लंकेश यांची हत्या झाली होती.

कर्नाटक पोलिसांनी या हत्येचा कट उलगडला असून पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या खुनाप्रकरणी कर्नाटक एटीएसने चिंचवडहून अमोल काळे याला ताब्यात घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.