बलात्कारी जलेबी बाबाचा तुरुंगात मृत्यू…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

हरियाणाच्या हिस्सार तुरुंगात बलात्कार प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या जलेबी बाबाचा मृत्यू झाला आहे. जलेबी बाबाने 120 हून अधिक महिलांवर बलात्कार केला होता. आधी तो महिलांना नशेचा चहा देऊन बेशुद्ध करायचा आणि नंतर अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचा. हिसार येथील सेंट्रल जेल-2 मध्ये जलेबी बाबा कैदेत होता.

कोण होता जलेबी बाबा?

जलेबी बाबाचे नाव अमरपुरी आहे. आधी तो जलेबी विकायचा, मग तो बाबा बनून तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करायचा. जलेबी बाबा महिलांना चहामध्ये नशेचे औषध देऊन बेशुद्ध करायचे, त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचे.

2018 मध्ये पहिल्यांदा आला चर्चेत

2018 मध्ये जलेबी बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांना आश्रमातून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. याशिवाय सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडिओही पाहायला मिळाले. अनेकांनी त्याला विरोधही केला होता.

जलेबी बाबा कसा बनला?

जलेबी बाबा पंजाबमधील मानसा येथील रहिवासी होता. रोजगारासाठी तो हरियाणातील टोहाना शहरात आला आणि रस्त्यावर जिलेबी विकू लागला. दिवसेंदिवस लोक त्याला ओळखू लागले. त्याची ओळख बिल्लू की जलेबी म्हणून तो प्रसिद्ध झाला होता. एका बाबाला भेटल्यानंतर त्याने आश्रम बांधला आणि मग बिल्लूपासून ते जलेबी बाबा झाला.

आश्रमाच्या आडून महिलांवर बलात्कार

आश्रमात महिला येत असत. जलेबी बाबा त्यांच्या समस्या ऐकत असे. त्यानंतर तो महिलांना ड्रग्ज देऊन बलात्कार करायचा आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचा.

Leave A Reply

Your email address will not be published.