६ दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद ; पोलिसांकडून शोध सुरु
जळगाव;- शहरातील गजबजलेल्या सुभाष चौक परिसरातील सराफा बाजारात राविवारी पहाटे ६ दरोडेखोरांनी मागील गल्लीतून प्रावेश करून लागोपाठ ८ ते १० कुल्लुपे तोडून सुमारे ६०० ग्राम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातवरण पसरले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान गेल्या ६ महिन्यामध्ये हि घडलेली चौथी घटना आहे . सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये ६ दरोडेखोर कैद झाले आहेत.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जळगाव शहरातील सराफ बाजारात भवानी माता मंदिराच्या समोर महेंद्र कोठारी यांच्या मालकीचे सौरभ ज्वेलर्स नावाने दुकान आहे. रविवारी दुकानात २ लोक बाहेरच गेट बंद करून झोपले होते. पहाटे ३.४० च्या सुमारास ३ दुचाकीवर आलेल्या ६ दरोडेखोरांनी दुकानाच्या मागील गल्लीतून ग्रिल तोडत आत प्रवेश केला.

सौरभ ज्वेलर्स दुकानात रात्री २ जण झोपलेले होते. दरोडेखोरांनी मागील बाजूने प्रवेश करीत त्यांना चाकू लावत आणि जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानातील विविध ८ ते १० कुलूप कापत त्यांनी तोडून जवळपास ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. पुन्हा मागील बाजूने बाहेर पडत दरोडेखोरांनी पळ काढला.
पोलिसांचा गस्तीच्या वाहनाचा आवाज आला, त्यामुळे त्यांनी घेतलेला जेवढा आहे तेवढा मुद्देमाल घेऊन पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर कामगारांनी दुकानाचे मालक कोठारी यांच्याशी संपर्क साधून दरोडा झाल्याची माहिती दिली. महेंद्र कोठारी यांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते.
परंतु बाहेरचे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले सहा जण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जवळपास 300 ग्रॅम वजनाचे सोने लुटून नेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप गावित यांच्यासह पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.