भाजप नेते गिरीश महाजन झाले आजोबा ; सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर

0

जळगाव ;-भाजप नेते व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आजोबा झाले असून त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असतांना त्यांना ही बातमी कळाली.  त्यांनी हॉस्पिटलला भेट दिली. त्यानंतर त्यांनी नातवाबरोबरचे फोटो पोस्ट केले.

सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये ना. गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, कुटुंबातील आपणा सर्वांना आम्ही आजी – आजोबा झाल्याची गोड बातमी देतांना अत्यानंद होत आहे… कन्या श्रेया व जावई अक्षय यांच्या संसारवेलीवर प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने गोंडस मुलाच्या रूपात सुंदर फुल उमलले !
कुटुंबातील या चिमुकल्याच्या सोबतीने लहानपण पुन्हा जिवंत करण्यास आतुर आहोत.

https://www.facebook.com/photo?fbid=983973773088690&set=pcb.983974029755331

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.