विश्वास’ हीच बाफना ज्वेलर्सची परंपरा! ; ‘ती’ माहिती गैरसमजुतीतून : सिद्धार्थ बाफना

0

जळगाव ;- शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी कुसुंबा चेक नाक्यावर शोरुमच्या मालाची वाहतूक करणारे वाहन प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने थांबवून ते एमआयडीसी पोलिसाच्या स्वाधीन केले होतेे; मात्र त्यातील मालासंदर्भातील जे वजन दिले गेले ते गैरसमजुतीतून दिले गेले होते. प्रत्यक्षात वाहनात कमी वजनाचे मौल्यवान दागिणे होते. विश्वास हीच बाफना ज्वेलर्सची परंपरा असून ती कायम राहिली अशी माहिती रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुसुंबा चेक नाक्यावरील घटनेनंतर शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा या शोरुममध्ये शनिवार दि. 20 रोजी सायंकाळी आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली. पथकाने कुठल्याही स्वरुपाचा माल जप्त केला नव्हता. केवळ चौकशी करण्यात आली. वाहनात असलेला माल हा डब्यांसहित वजन करुन दाखविण्यात आला; प्रत्यक्षात या वस्तूंचे वजन केवळ 21 किलो ग्रॅम होते. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र चेक पोस्ट असून महसूल विभागाने नियमित तपासणी म्हणून वाहन थांबविले होते. सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी सिक्वेल लॉजिस्टिक यांना वाहन घेवून जाण्याची सूचना केली. त्यानुसार शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिसांनी सुरक्षा पुरवित वाहन कंपनीकडे दिले आहे. या संपूर्ण प्रकरणात बाफना ज्वेलर्सवर कुठलही धाड पडली नसून केवळ चौकशी झाली असल्याची माहिती सिद्धार्थ बाफना, सुशीलकुमार बाफना यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.