लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय ऑयकॉन म्हणून आर. जे. शिवानीची नियुक्ती

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता स्वीप अंतर्गत जळगाव जिल्हास्तरीय आयकॉन म्हणून शिवानी नेवे (आर.जे.शिवानी) हिची नियुक्ती जिल्हा प्रशासनाकडून नुकतीच करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून शिवानीला सदरील नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोघं लोकसभा मतदारसंघातील निवडणुका चौथ्या टप्प्यात होणार असून मतदान दि.१३ मे २०२४ रोजी होणार आहे. सदर निवडणूकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात मतदारांना मतदानाकरिता प्रेरीत करण्यासाठी व नागरिकांमध्ये मतदान या राष्ट्रीय कर्तव्याची भावना वृद्धिंगत करणेसाठी जनजागृती आणि निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी व प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा आयकॉन म्हणून निवड केली जाते.

शिवानी नेवे ही जळगावला आर.जे.म्हणून कार्यरत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आर जे शिवानी जिल्हा आयकॉन म्हणून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नागरिकांना मतदानासाठी प्रेरीत करणार आहे. शिवानी ही मूळ साकळी ता.यावल येथील रहिवाशी असून चिखली येथील श्रीदत्त हायस्कूलचे कलाशिक्षक दामोदर नेवे व माध्य.विद्यालय शिरसाड-साकळी शाळेच्या उपशिक्षिका सौ.शुभदा नेवे यांची मुलगी असून  साकळी येथील पत्रकार चंद्रकांत नेवे यांची पुतणी आहे. जिल्हा आयकॉन म्हणून शिवानी नेवेची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.