नवनीत राणांच ओवैसीनां खुले आव्हान

0

लोकशाही न्युज नेटवर्क –

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा हैदराबाद हा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपाने प्रचारात पूर्ण ताकद झोकली आहे. भाजपाने हैदराबादमधून असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात माधवी लता यांना तिकीट दिलं आहे. हिंदुत्ववादी नेत्या म्हणून माधवी लता यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या माधवी लता यांच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये गेल्या होत्या. तेलंगणसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपाने नवनीत राणा यांचा समावेश केला आहे. याच नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे प्रचारा दरम्यान वाद निर्माण होईल असं वक्तव्य केलं आहे. भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी नाव न घेता ओवैसी बंधुंवर प्रहार केला.
नवनीत राणा यांनी प्रचारसभेत एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वादग्रस्त विधानाचा दाखला दिला. “छोटा म्हणतो पोलिसांना 15 मिनिटासाठी हटवा, मग आम्ही दाखवतो काय करु शकतो ते, छोट्याला माझं एवढच सांगणं आहे की, तुला 15 मिनिट लागतील, पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवलं, तर छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) आणि मोठा (असदुद्दीन ओवैसी) यांना समजणारच नाही की, ते कुठून आले आणि कुठे गेले” असं नवनीत राणा म्हणाल्या. वर्ष 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवैसीने हे प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. अकबरुद्दीन म्हणालेला की, 15 मिनिटासाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही दाखवून देऊ, कोणात किती दम आहे. या प्रकरणात कोर्टाने त्यांची सुटका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.