आरबीआयच्या नियमात बदल, नवीन नियम लागू

0

मुंबई – लोकशाही न्युज नेटवर्क 

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कॅश (रोख) कर्जाच्या मर्यादेबाबत एक नवीन अलर्ट जारी केला आहे. या पत्रात आरबीआयने नॉन-फायनान्शियल बँकिंग कंपन्यांना म्हणजे NBFC संसथांना रोख कर्ज मर्यादेबाबतचे नियम पाळण्यास सांगितले आहे. आरबीआयने नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना कोणत्याही ग्राहकाला २०,००० रुपयांपेक्षा जास्त कॅशने कर्ज न देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. आयकर कायदा, १९६१ च्या कलम 269SS अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला २० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम कर्ज म्हणून मिळू शकत नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँकेने अनेक NBFC कंपन्यांवर कारवाई केली ज्यांनी केंद्रीय बँकेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. यादरम्यान, अधिक कॅश लोन देण्याच्या नियमाचेही उल्लंघन झाले, परिणामी आरबीआयने एनबीएफसींना नियमांची आठवण करून देऊन अशा सूचना दिल्या आहेत जेणेकरून निष्काळजीपणा आणि नियमांकडे दुर्लक्ष करणे थांबवता येईल.
हवालानुसार आरबीआय आता आयकर कायद्यातील हा नियम आणखी कठोर करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे जेणेकरून NBFC कंपन्यांना धोका पत्करावा लागू नये आणि नियमांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. IIFL फायनान्स या एनबीएफसी कंपनीवर अनेक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने नवीन सूचना जारी केल्या आहेत. वरील अहवालात काही कंपन्यांनी कायद्यात ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रोखीने कर्जे दिले आणि जमा केल्याचे वृत्त आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.