मुंबई विमानतळावरील विमान सेवा सहा तास बंद

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क –
.
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने आज दि. ९ रोजी मुंबई विमानतळावर देखभालीचे काम करण्यात येणार आहे. याकरिता मुंबई विमानतळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा वेळेत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान सेवा पूर्णपणे बंद असेल, असे विमानतळ प्रशासनाने कळविले आहे
मान्सूनमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान प्रवास व सर्व सुविधा सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी हे देखभालीचे काम दरवर्षी करण्यात येते. या कामाची माहिती सर्व विमान कंपन्यांना सहा महिने अगोदरच देण्यात आली आहे. तसेच, ११ ते ५ या कालावधीमध्ये विमानसेवा तात्पुरती बंद राहणार असल्याने विमान कंपन्यांनी त्या अनुषंगाने आपल्या विमानांचे नियोजन करावे, असेदेखील या कंपन्यांना सूचित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजल्यानंतर मुंबईतून विमानसेवा सुरळीत होणार आहे. १०३३ एकरवर विमानतळ पसरले असून, त्याची देखभाल करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.