बॅनरवर नाव न टाकल्याच्या रागातून जळगावात गोळीबार ; आरोपीला पिस्तुलासह अटक

0

जळगाव :-  बुधवारी पहाटे साडेतीन वाजता गेंदालाल मिल परिसरात ऊरुस व संदल कार्यक्रमात झालेल्या वादातून  बाबूराव उर्फ भिकन शेख (रा. गेंदालाल मिल) याने हवेत दोन राऊंड फायर केले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात नशिराबाद येथून गोळीबार करणाऱ्याला अटक केली असून त्याचयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गेंदालाल मील परिसरात अली सैय्यद रज्जाक हे भंगार विक्रेता वास्तव्यास आहे. दि. ५ मे रोजी गेंदालाल मिलपरिसरात बाबा मौला अली मौला यांचा ऊरुस व संदलचा कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमात बॅनरवर अली सय्यद रज्जाक यांच्या मुलाचे व त्यांच्या ग्रुपचे नाव न टाकल्याच्या कारणावरुन अली सय्यद रज्जाक यांचा मुलगा कासीम याचा बाबूराव उर्फ अस्लम भिकन शेख यांच्यासोबत वाद झाला होता. बुधवार दि. ८ मे रोजी अली सय्यद रज्जाक यांचे कुटुंबिय घरात झोपलेले असतांना, पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजावर दगडफेकत असल्याचा त्यांना आवाज आला.

घराच्या दरवाजावर दगडफेक होत असल्याने अली सय्यद यांचे कुटुंबिय गॅलरीत आले. त्यांनी त्याठिकाणाहून बघितले असता, त्यांना घराच्या खाली गल्लीत बाबूराव उर्फ अस्लम भिकन शेख हा हातात गावठी पिस्तुल घेवून उभा होता. त्याने गॅलरीतील लोकांना पाहून त्यांना शिवीगाळ करत बाहेर येण्याच धमकी देत हवेत दोन राऊंड फायर केले.

कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजून गेली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणाहून फायरिंग झालेल्या रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.