महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ६ जुलै रोजी

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क –

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी ६ जुलैला घेतली जाणार असल्याची घोषणा बुधवारी आयोकडून करण्यात आली. राज्य सरकारच्या विविध भागांमधील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

याआधी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी २९ डिसेंबर २०२३मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिराती २७४ पदांसाठी २८ एप्रिल २०२४मध्ये परीक्षा होणार असल्याचे लिहिले होते. मात्र त्याच वेळेस राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यात १० टक्के स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली गेली. त्यामुळे सुधारित वेळापत्रकानुसार आता ६ जुलेला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.

उप जिल्हाधिकारी, गट-अ (७ पदे),सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (११६ पदे), गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (५२ पदे), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (४३ पदे)
मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (१९ पदे) , सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (२५ पदे)सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (५२ पदे) , निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (७६ पदे) , सहायक वनसंरक्षक, गट-अ, (३२ पदे), वनक्षेत्रपाल, गट-ब, (१६ पदे) , स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (४५ पदे).
९ मे २०२४ ते २४ मे २०२४ला २३.५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची मुदत – २४ मे २०२४ला २३.५९ वाजेपर्यंत
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत २६ मे २०४ला २३.५९वाजेपर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुद २७ मे २०२४ ला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.