सोयाबीन पिकाचे हे वाण देतील विक्रमी उत्पन्न

0

लोकशाही न्युज नेटवर्क-

राज्यातील मराठवाडा, विदर्भ या विभागात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याची लागवड पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाहायला मिळते. यंदा तर भारतीय हवामान खात्याने मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे यंदा सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र काहीसे वाढू शकते असे म्हटले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही येत्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास करणार आहे.

खरे तर सध्या स्थितीला राज्यातील शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी पूर्व मशागत करत आहेत.पूर्व मशागतीची कामे युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही दिवसात सोयाबीन पेरणीला सुरुवात होणार आहे.

आपण सोयाबीनच्या 2 प्रमुख जातींची माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या सोयाबीन जातींची माहिती जाणून घेणार आहोत ते वाण अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होतात.
जे.एस. ९५६० : राज्यातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीनचा हा लवकर काढण्यासाठी तयार होणारा वाण आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीक पेरणीनंतर अवघ्या 82 ते 88 दिवसांच्या कालावधीत या जातीचे सोयाबीन पीक तयार होते.

चार दाण्यांचे शेंगा असलेले हे वाण दुष्काळ सहन करण्यास सक्षम आहे. दुष्काळी परिस्थिती असली तरी देखील या जातीपासून चांगले उत्पादन मिळवता येते.

जे. एस. ९३०५ : हे वाण देखील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. २००२ मध्ये प्रसारित झालेले हे वाण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावले जाते. सोयाबीनच्या या जातीपासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळत आहे.

पीक पेरणीनंतर ८५-९० दिवसांत या जातीचे पीक परिपक्व होते. हलकी व मध्यम जमिनीत पेरणीसाठी उपयुक्त असा हा वाण आहे. या जातीपासून सरासरी 20 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.