“मोदीजी थोडे घाबरले आहेत का?” ; अदानी अंबानींबद्दलच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा प्रहार… (व्हिडीओ)

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अदानी आणि अंबानींबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधींनी अधिकृत हँडलवर एक व्हिडिओ जारी केला याशिवाय राहुलने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, नमस्कार मोदीजी, तुम्ही थोडे घाबरले आहात का?

पहिल्यांदा तुम्ही अदानी-अंबानी सार्वजनिकपणे बोललात

राहुल गांधी म्हणाले की, साधारणपणे तुम्ही अदानी आणि अंबानींबद्दल बंद खोलीत बोलतात. पहिल्यांदा तुम्ही अदानी अंबानीला सार्वजनिक बोल लात आणि ते टेम्पोमध्ये पैसे देतात हेही तुम्हाला माहीत आहे. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम करा, त्यांच्याकडे सीबीआय. ईडी पाठवा, पूर्ण चौकशी करा, लवकरात लवकर पूर्ण करा, मोदीजी घाबरू नका.

आम्ही करोडो लखपती निर्माण करू

राहुल पुढे म्हणाले की, मी देशाला पुन्हा सांगत आहे की नरेंद्र मोदीजींनी या लोकांना जेवढा पैसा दिला आहे तेवढाच पैसा आम्ही देशातील गरीब जनतेला देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली पक्की नोकरी योजना, या योजनांच्या माध्यमातून आपण कोट्यवधी लोकांना लखपती बनवू. त्यांनी 22 अब्जाधीश केले, आम्ही लखपती बनवू.

Leave A Reply

Your email address will not be published.