जी२० ॲग्रीटेक समिटमध्ये योगदानाबद्दल जळगावमधील उद्योजकांची अमिताभ कांत यांनी केली प्रशंसा

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

नवी दिल्ली येथे २८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या जी२० इंडिया ॲग्री-टेक समीट २०२३ मध्ये जळगावमधील उद्योजकांच्या लक्षणीय व सक्रिय सहभागाबद्दल भारताचे जी२० शेर्पा अमिताभ कांत यांनी या उद्योजकांची भरभरून प्रशंसा केली. या परिषदेला संबोधित करताना, भारतीय कृषीक्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी तंत्रज्ञान, इनोव्हेशन व डेटाच्या परिवर्तनकारी क्षमतेवर कांत यांनी भर दिला.

आपल्या प्रेरणादायी बीजभाषणात कांत म्हणाले, “तंत्रज्ञान, इनोव्हेशन व डेटा ही भारतीय कृषीक्षेत्रातील पुढील मोठी हरितक्रांती होऊ द्या, ज्यामुळे भारतीय कृषीक्षेत्राकडे सुकाणू येऊ शकेल.” त्यांच्या नेतृत्वाखाली, या वर्षीच्या जी२० साठी कृषीक्षेत्राचे डिजिटायझेशन आणि तांत्रिक प्रगतीचा समावेश हे घटक भारतीय राष्ट्रपतींच्या अजेंड्यामध्ये केंद्रस्थानी आहेत.

कृषीक्षेत्राने डेटाच्या आधारे कामकाज करावे, स्मार्ट व्हावे व हवामान बदलाला सामोरे जावे ही गरज कांत यांनी अधोरेखित केली. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी हे परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ओपन ॲक्सेस डेटा प्लॅटफॉर्म्सच्या महत्त्वावर त्यांनी विशेष भर दिला. या परिवर्तनाला चालना देण्यासाठी स्टार्टअप्सनी सक्रिय पुढाकार घ्यावा आणि ‘ग्लोबल पब्लिक गुड्स’ म्हणून त्यांची दखल घेतली जावी, असे ते म्हणाले.

सौदी अरेबियामधील शिष्टमंडळाचा सहभाग हा या परिषदेचा एक उल्लेखनीय भाग होता. त्यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आणि जागृती इन्क्युबेशन सेंटरसोबत त्यांनी सामंजस्य करार केला. या निमित्ताने ॲग्री-टेक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोग अधिक मजबूत झाला.

नीरजा फाउंडेशनचे अध्यक्ष मोहित जैन व लीलावती फाउंडेशनचे संचालक राजसिंग निंबाळकर यांच्यातर्फे नवी दिल्ली येथील प्रतिष्ठित हयातमध्ये जी२० इंडिया ॲग्रीटेक समिटचे आयोजन करण्यात आले होते. कृषी क्षेत्रामध्ये संवाद व इनोव्हेशन घडविण्यासाठीच्या प्लॅटफॉर्मला चालना देणाच्या त्यांच्या निर्धाराची व दूरदृष्टीची सर्वांनीच प्रशंसा केली.

या परिषदेच्या प्राप्त झालेल्या उल्लेखनीय यशासाठी संबंधित भागीदार व पाठीराख्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. उल्लेखनीय व्यक्ती व संस्थांमध्ये शासन ग्रुपचे अभय श्रीश्रीमल, जागृती इन्क्युबेशन सेंटरचे शशांक मणी, जैन इरिगेशनचे अनिल जैन व सुंदर मखिजा, एरिज ॲग्रोचे राहुल मीरचंदानी आणि कौशल लँडमार्कचे धीरज छाजेड यांचा समावेश आहे. या द्रष्ट्यांनी, तंत्रज्ञान व इनोव्हेशनच्या माध्यमातून कृषीक्षेत्रातील क्षमतांचा अधिकाधिक उपयोग करण्याचे महत्त्व जाणले.

जितो, जैन इरिगेशन, पगारिया ग्रुप, डीटाउन रोबोटिक्स, नवकार ॲग्रो प्रोडक्ट्स आणि स्टान्च इव्हेंट्स यांनी कृषी क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी त्यांचा निर्धार दर्शवला. या परिषदेमध्ये अधोरेखित झालेल्या सहकाराच्या वृत्तीचे हे द्योतक होते.

जी२० इंडिया ॲग्रीटेक समिट २०२३ ला भरघोस यश मिळाले. एकीकडे या परिषदेत अत्यंत फलदायी चर्चा झाल्या, त्याचप्रमाणे अमिताभ कांत यांच्यासारख्या प्रख्यात नेत्यांकडून या परिषदेची दखल घेतली गेली आणि त्यांनी या परिषदेची प्रशंसा केली. भारतीय उद्योजकांनी, विशेषतः जळगावमधील उद्योजकांनी या परिषदेमध्ये निभावलेल्या भूमिकेचे महत्त्व येथे ठळकपणे उठून दिले. स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर हे उद्योजक कृषी क्षेत्रातील इनोव्हेशन व प्रगतीला चालना देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.