लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वर्षभरात तूरडाळीच्या दरात तब्बल 40 टक्क्यांची घसघशीत वाढ झाल्याने घाऊक बाजारात प्रतिकिलो डाळीचे भाव 170 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र आता नवीन माल येणार असल्याने तूरडाळ 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मूगडाळ 10 रुपयांनी उतरली असून, चणा, उडीद आणि मसूरडाळीचे दर स्थिर असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, तूरडाळीच्या दरात सातत्याने वाढ सुरू असल्याने किरकोळ बाजारात प्रतिकिलो दर 200 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूरडाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करत थेट शेतकर्यांकडून खरेदीचा आणि डाळी आयात करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत डाळींचे भाव तेजीत होते. मात्र, नवीन मालाची आवक होणार असल्याने तूरडाळ 20 रुपयांनी स्वस्त होऊन 150 रुपये, मूगडाळ 108 रुपये तर, चणाडाळ 70 रुपये किलोवरआली. मसूर, उडीदडाळीचे दर स्थिर आहेत.