वाळू माफियांची मुजोरी, प्रातांधिकाऱ्यांच्या वाहनावर चढवले ट्रॅक्टर

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगाव जिल्ह्यामध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढतच आहे. अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडवणाऱ्या चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या खाजगी वाहनावर थेट ट्रॅक्टर चढवून धडक दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खडगाव गावाजवळ घडली. यात प्रांताधिकाऱ्यांचे वाहनाचे नुकसान होऊन त्यांच्या ते किरकोळ जखमी झाले आहे. तर तलाठी यांनाही ट्रॅक्टर चालकाने जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा येथील प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे हे जळगावला मीटिंग संपवून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भोकर -खेडीभोकरी मार्गे चोपड्याकडे येत असताना त्यांना अवैधरित्या वाळू भरलेले ट्रॅक्टर दिसले. यावेळी खडगाव जवळ तलाठी गुलाबसिंग पावरा यांना पुढे माहिती देऊन ट्रॅक्टर थांबवण्यासाठी सांगितले. या घटनेमध्ये ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता तो उलट तलाठी पावरा यांना शिवीगाळ करत ट्रॅक्टर पुढे घेऊन जात होता. या वेळी प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे यांनी ट्रॅक्टरच्या पुढे स्वतःच्या ताब्यातील कार (एमएच -२० एफ वाय ०२१६) उभी केली असता चालक राजेश विकास मालवे (रा.खरग ता चोपडा) याने ट्रॅक्टरला (एमएच १९-बी जी ८०७६) गाडीला मागून जबर धडक दिली.

दरम्यान या धडकेत प्रांताधिकारी यांची गाडी मागून ठोकली जाऊन तिचे नुकसान होऊन प्रांताधिकारी यांना देखील दुखापत झाली आहे. त्यामुळे वाळू माफियांची चांगली मुजोरी वाढली असून प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे याच्या फिर्यादी वरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर वरील चालक राजेश विकास मालवे व मालक सुरेंद्र कोळी (रा. चोपडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ किरण पाटील करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात महसूल कर्मचारी नायब तहसीलदार सचिन बाबळे उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.