‘या’ महिलेने कमाईच्या बाबतीत टाकले अंबानी, बिर्ला यांना मागे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी २०२३ मध्ये कमाईच्या बाबतीत बड्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत ९.६ अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे.

अंबानी आणि बिर्ला यांसारख्या दिग्गजांच्या संपत्तीतील वाढीपेक्षा सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत जास्त वाढ झाली आहे. एकीकडे त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे त्यांच्या कुटुंबावर संकटाचे ढग दाटत आहेत.

पती ओमप्रकाश जिंदाल यांच्या निधनानंतर सावित्री जिंदाल यांनी समूहाची जबाबदारी स्वीकारली. कोरोना काळात सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत सुमारे पन्नास टक्क्यांनी घट झाली होती. त्यावेळी झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. आज त्यांनी जिंदाल ग्रुपला उंचावर नेऊन ठेवले आहे.

जिंदाल समूहामध्ये JSW स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, JSW एनर्जी, जिंदाल सॉ, जिंदाल स्टेनलेस आणि गुंतवणूक कंपनी JSW होल्डिंग यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. ओपी जिंदाल ग्रुपकडे पोर्ट ऑपरेटर JSW इन्फ्रास्ट्रक्चरची 83% मालकी आहे जी या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली.

कोण आहेत सावित्री जिंदाल?

– सावित्री जिंदाल या स्टील किंग ओपी जिंदाल यांच्या पत्नी आणि माजी खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहे.

– सावित्री जिंदाल ३५० कोटी डॉलर्सच्या मालक आहे. यांचा जन्म २० मार्च १९५० रोजी हरियाणातील हिसार येथील तिनसुकिया     येथे झाला.

– जिंदाल ग्रुपच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन सावित्री जिंदाल 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात पतीचा मृत्यू         झाल्यापासून ग्रुपच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

– ओपी जिंदाल हिसारमधून आमदारही राहिले आहे. २००५ मध्ये यांच्या मृत्यूनंतर सावित्री जिंदाल यांनी हिस्सारच्या राजकारणात प्रवेश केला आणि त्या आमदार झाल्या

Leave A Reply

Your email address will not be published.