जनतेच्या मनात मोदी सरकारच !

आमदार मंगेश चव्हाण : प्रचाराला उत्तम प्रतिसाद

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जनतेच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांचा प्रधानमंत्री करण्यासाठी भाजपाला मतदान करावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते तालुक्यातील बंजारा तांडा वस्तीवर प्रचार दौऱ्यात बोलत होते.

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव तालुक्यातील बंजारा तांडा वस्तीवर प्रचार दौऱ्यांचे नुकतेच आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे होते. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी कॉर्नर सभेला संबोधित केले. राजदेहरे गावाला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी सभापती, उपसभापती, पंचायत समिती माजी सभापती, सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, महायुतीचे तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठया संख्येने उपस्थित होते. जनतेच्या मनात मोदीजी असून फक्त तिकीट मिळाले नाही म्हणून आई समान पक्षाशी गद्दारी करणाऱ्या वृत्तीला धडा शिकविण्याचा मनोदय यावेळी अनेकांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.