नांदुरा तालुक्यात रक्षा खडसे यांच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क 

भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दि. 1 मे रोजी नांदुरा तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदुरा तालुक्यातील मौजे वडनेर भोलजी, चांदुरबिस्वा, मामुलवाडी, अलमपुर, निमगांव, हिंगणे गव्हाळ, येरळी या गावात प्रचारार्थ रॅली काढून मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी माजी आमदार चैनसुख संचेती, शिवा तायडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक गावात प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद लाभला.

नांदुरा तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे या मित्र पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते. नांदुरा तालुक्यातील मौजे वडनेर भोलजी, चांदुरबिस्वा, मामुलवाडी, अलमपुर, निमगांव, हिंगणे गव्हाळ, येरळी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.