जळगाव : जामनेर येथे नवीन गॅरेज घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करत विवाहितेला शिवीगाळ करत छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिरसोली गावातील माहेर असलेल्या नाजमीन जाकिर पिंजारी (वय- २४) यांचा विवाह जामनेर येथील जाकीर लतीफ पिंजारी यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. विवाहितेला माहेराहून नवीन गॅरेज सुरू करण्यासाठी ५ लाख रुपये आणावे असे मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही, या रागातून पती जाकीर लतीफ पिंजारी याने विवाहितेला शिवीगाळ छळ केला. तसेच सासू-सासरे आणि जेठ यांनी देखील पैशांसाठी तगाता लावला. दरम्यान हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी शिरसोली येथे निघून आल्या. त्यानंतर बुधवार दि. १५ मे रोजी त्यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती जाकीर लतीफ पिंजारी, सासू नूरजहा लतीफ पिंजारी, सासरे लतीफ भिकन पिंजारी आणि जेठ जावेद लतीफ पिंजारी सर्व राहणार जामनेर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान टहाकडे हे करीत आहे.